कनकापूर ता.देवळा जि.नाशिक
kankapurgp1974@gmail.com
कनकापूर ता.देवळा जि.नाशिक
kankapurgp1974@gmail.com
कनकापूर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १८१८ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ३ ,माध्यमिक विद्यालय १ ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सप्तशृंगी माता मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभामंडप, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर कांदा, बाजरी, गहू व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व मका या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
कनकापूर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कनकापूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे ज्यात गावाला अटल भूजल योजनेत जिल्हास्तरीय तिसरे स्थान पटकावले.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
आज आदर्शतेकडे वाटचाल करणारे गाव म्हणून कनकापूर महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ(हेक्टर)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
कनकापूर हे गाव साध्या, कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून कांदा, बाजरी, मका आणि विविध हंगामी भाज्या यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यतिरिक्त काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लघुउद्योग या क्षेत्रांतही कार्यरत आहेत.
गावात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा तसेच आठवडी बाजार हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. आदिवासी परंपरा आणि संस्कृतीही येथे तितक्याच जपल्या जातात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र यांसह स्थानिक देवतांच्या जत्रांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदत करणारे आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. ग्रामविकासात महिलांचा सहभाग स्वयंसाहाय्य गटांमुळे प्रकर्षाने जाणवतो. तरुण पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
कनकापूरच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण व आदिवासी संस्कृतीसोबतच आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो, ज्यामुळे गाव विकास आणि एकतेचा उत्तम संगम घडवते.
प्रेक्षणीय स्थळे
ग्रामदैवताचे मंदिर – सप्तशृंगी माता ही गावातील ग्रामदैवते असून त्यांची मंदिरे गावकऱ्यांची अखंड श्रद्धास्थाने आहेत. येथे दरवर्षी साप्ताह, यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात.
हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही मंदिरे सण-उत्सवांच्या काळात ग्रामस्थांच्या एकत्र येण्याचे व संवाद साधण्याचे केंद्रस्थान ठरतात.
कांचन किल्ला आणि शिवकालीन इतिहास – गावात असलेला कांचन किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी निगडित असा प्राचीन वारसा जपतो. ऐतिहासिक घटनांचा हा साक्षीदार आजही पाहणाऱ्यांना इतिहासाशी जोडतो.
शेती क्षेत्र – कनकापूर कांदा , बाजरी व मका उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथे पसरलेली हिरवीगार शेती पाहण्यासारखी आहे. शेती हा ग्रामजीवनाचा मुख्य आधार आहे.
जलसंधारण प्रकल्प – गावात पाणलोट क्षेत्र विकास व जलसंधारणाच्या उत्तम उपाययोजनांमुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसते. मनरेगा (MREGS) व अटल भूजल योजनेअंतर्गत मातीतळे, गावतळे, शेततळे आणि वळण बंधारे उभारण्यात आले आहेत. यामुळे शेतीला तसेच गावकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. या कामगिरीबद्दल गावाला जिल्हास्तरीय अटल भूजल स्पर्धेत तिसरे स्थान मिळाले आहे.
कांचना किल्ला हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सातमाळ्याच्या डोंगररांगेत आहे.
हा किल्ला सध्या भग्नावस्थेत असून त्यावर थोड्याफार प्रमाणावर ऐतिहासिक अवशेष त्याचप्रमाणे गुहा व टाक्यांचे अस्तित्त्व पहावयास मिळते.कांचन किल्ल्याच्या पायथ्यापासून जाणाऱ्या वाटेस काचन बारी म्हणून प्रसिद्ध आहे शिवाय या रस्त्याचे खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली त्यावेळेस परतीच्या प्रवासात येत असताना.व सोबत लुट नेत असताना मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झाला होता मोगल सरदार दाऊदखान हा चांदवड येथे मुक्कामास राहून छत्रपती शिवरायांना अडवण्याचा विचार करीत होता यादरम्यान त्याने चांदवड वन काचन बारी जवळ छत्रपती शिवरायांना गाठून त्यांच्या जवळ असलेला ऐवज हा पुनश्च मोगलांच्या ताब्यात घेण्याचे ठरवले होते. मात्र छत्रपती शिवरायांनी अतिशय धैर्याने काचंन बारीच्या मोगलांशी सामना करून तुंबळ युद्ध 17 ऑक्टोंबर 1670 रोजी लढले यात मोगलांचा दारुण पराभव झाला.
छत्रपती शिवरायांनी या युद्धामध्ये स्वतः सहभाग घेतला व हे युद्ध गनिमी कावा या तंत्राचा वापर न करता बेरीर गिरी या तंत्राचा वापर करून प्रचंड ताकदीने शत्रु सैन्यावर हमला करणे अशा प्रकारे युद्ध करून हे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे युद्ध ठरले होते. कांचन किल्ल्याजवळ झालेल्या युद्धातील विजयानंतर छत्रपती शिवराय वनी दिंडोरी मार्गेेेेेेे नाशिक व तेथून त्रंबकेश्ववर मार्गे कोकणात उतरलेत
कांचन बारी या ठिकाणी नाशिक बस उपलब्ध होऊ शकते. नाशिक देवळा बस मध्ये खेलदरी या गावाजवळ उतरून पायी पायी आपण कांचन भारी पर्यंत पोहोचू शकतो किंवा वडाळीभोई येथून उत्तरेला शिंदे गाव वा जवळून आपण कांचन भारी पर्यंत पोचू शकतो छत्रपती शिवरायांनी कांचना डोंगराजवळ केलेल्या युद्धाची जागा अजूनही निश्चित नाही.
महा आवास अभियान अंतरगत सन २०२०/२१ मध्ये आदर्श गृह संकुल पुरस्कार - *राज्यस्थरीय तृतीय क्रमांक*
अटल भूजल योजने अंतर्गत २०२३/२४ जिल्हा स्तरीय पारितोषिक क्रमांक
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१६/१७
तंटामुक्त पुरस्कार सन २०१७/१८
आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार २०१७/१८
स्मार्ट ग्राम पुरस्कार २०१६/१७
उत्कृष्ठ गृह संकुल पुरस्कार २०२१/२२ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
1.श्री. मनोज खंबाईत (तलाठी)
2.श्री. जयेश साहेबराव मोरे (कोतवाल)
3.श्रीमती. सरिता मोहन मिस्तरी (BLO)
4.श्री. दौलत बाबुराव जैन व दिगंबर बापू सोनवणे (पोलीस पाटील)
5.श्रीमती. मायावती निकम (सहाय्यक कृषी अधिकारी)