मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)
तारीख : 17/09/2025 - 31/12/2025 क्षेत्र: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)
(ग्रामविकास विभाग- शासन निर्णय- दिनांक ६ ऑगस्ट २०२५ )
पार्श्वभूमी:-राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाचा हेतू-
• कार्यक्रमाचेनाव: – मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान (सन२०२५-२६)
• विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
• लोकांचे जीवनमान उंचावणे
• नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
• आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे
अभियानाचा कालावधी- दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५
अभियानाचे प्रमुख ७ घटक-
१.सुशासनयुक्तपंचायत (लोकाभिमुखप्रशासन)- समाविष्ट महत्वाचे घटक :
• नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या५ ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्धर करुन देणे.
• नागरीकांच्याई सर्व तक्रारी निकाली काढणे.
• ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यािवर सर्व माहिती प्रसिध्द् करणे.
• गावात सीसीटीव्हीे बसविणे.
• गावातील पात्र लाभार्थ्यांीना आयुषमान भारत कार्ड उपलब्धर करुन देणे.
• गावातील पात्र दिव्यां्गांना ओळखपत्र मिळवून देणे.
२.सक्षमपंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)- समाविष्ट महत्वाचे घटक:
• ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्यांया पेक्षा जास्तच वसूल करणे.
• हजार लोकसंख्येतमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्याकमधून लोकोपयोगी कामे करणे.
• ग्रामपंचायतीचे स्वयतःचे उत्पीन्नल वाढविण्याकसाठी विविध उपाययोजना हाती घेणे.
३.जलसमृद्ध, स्वच्छवहरितगाव – समाविष्ट महत्वाचे घटक:
• गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्दग पाणी पुरवठा करणे.
• सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्या्वर आणणे.
• पाण्या्च्यार स्त्रो तांचे बळकटीकरण करणे.
• अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविणे.
• वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे.
• गावातील घनकच-याचे व सांडपाण्या चे योग्य व्य वस्था पन करणे.
• बंदी असलेल्याव प्लासस्टिकचा वापर पूर्णतः बंद करणे.
४.मनरेगावइतरयोजनांचेअभिसरण- समाविष्ट महत्वाचे घटक:
• रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.
• या योजनेतून माती व जलसंधारण, घनकचरा व्यावस्थाापन, जनावरांचा गोठा, कुक्कु टपालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड,कांदाचाळ इ. कामे हाती घेणे.
• घरकुल बांधकामात या योजनेतून रु. २८,०००/- चे योगदान घेणे.
५.गावपातळीवरीलसंस्थासक्षमीकरण – समाविष्ट महत्वाचे घटक:
• ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध् करुन घेणे.
• गावांतील शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे.
• गावांत जास्ती त जास्त सौर उर्जेचा वापर करणे.
• गावातील स्मतशानभूमी विकास करणे.
• गावात क्रीडांगण व व्याायामशाळा उपलब्ध. करुन देणे.
६.उपजीविकाविकासवसामाजिकन्याय- समाविष्ट महत्वाचे घटक:
• मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करुन घेणे.
• गावातील बचत गटांचा विकासात सक्रीय सहभाग घेणे.
• बचत गटांतील जास्ती त जास्त महिलांना लखपती दिदी करणे.
• गावातील युवकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वनयंरोजगाराच्याघ संधी देणे.
• गावात शेती गट स्थानपन करुन त्यांिची उत्पाेदकता वाढविणे.
७.- लोकसहभागवश्रमदानातूनलोकचळवळ- समाविष्ट महत्वाचे घटक:
• लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे.
• आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे.
• गावातील रस्तेक दुरुस्तन करुन दळणवळणाला चालना देणे.
अभियानाची पूर्वतयारी-
राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय कार्यशाळांच्या माध्यमातून नागरिकांना व अधिकारी कर्मचारी यांना अभियानाचे प्रशिक्षण देणे.
१. राज्यस्तरीय कार्यशाळा दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी मा. ग्रामविकास मंत्री यांचे उपस्थितीत पार पडली. या कार्यशाळेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मनरेगा, प्रकल्प संचालक- पाणी व स्वच्छता, निवडक सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
२. जिल्हास्तरीय कार्यशाळा- दि. ०५ सप्टेंबर २०२५- आज संपन्न होत असून या कार्यशाळेसाठी सन्मा. लोकप्रतिनिधी, सरपंच, जिल्हा व तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी अशा साधारण २००० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आयोजनाची जबाबदारी- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची आहे.
३. तालुका/ पंचायतस्तरीय कार्यशाळा- या कार्यशाळा दि. ६ ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेसाठी तालुकास्तरीय वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, संगणक परिचालक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयोजनाची जबाबदारी- गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची असेल.
४. ग्रामस्तरीय कार्यशाळा- या कार्यशाळा दि. ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान ग्रामस्तरावर आयोजित येणार आहेत. या कार्यशाळेसाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आयोजनाची जबाबदारी- सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांची असेल.
५. विशेष ग्रामसभांचे आयोजन- दि. १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत चर्चा करण्यात येऊन ग्रामपंचायत अभियानात सहभागी होत असल्याबाबतचा ठराव करून गावातील नागरिकांचे अभियानातील घटकनिहाय लहान-लहान गट स्थापन करण्यात येतील. हे गट आपल्या गावाला/ग्रामपंचायतीला अभियानात यशस्वी करण्यासाठी काम करतील. नोडल अधिकारी ग्रामसभांना उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
मूल्यमापनप्रक्रिया:
– ग्रामपंचायतीनेस्वयंमूल्याकन-पंचायतसमितीकडेसादर (दि. १०जानेवारी२०२६)
– तालुकास्तरीयसमिती- (दि. ११ जानेवारी-२६जानेवारी२०२६)
– जिल्हास्तरीयसमिती- (दि. २८जानेवारी-१५फेब्रुवारी२०२६)
– विभागीयसमिती- (दि. १७फेब्रुवारी-२७फेब्रुवारी२०२६)
– राज्यस्तरीयसमिती- (मार्च२०२६)
– पुरस्कारवितरण- (मे२०२६)
पारितोषिके:
स्तर प्रथम द्वितीय तृतीय
तालुकास्तर १५ लक्ष १२ लक्ष ८ लक्ष
जिल्हास्तर ५० लक्ष ३० लक्ष २० लक्ष
विभागीय स्तर १ कोटी ८० लक्ष ६० लक्ष
राज्यस्तर ५ कोटी ३ कोटी २ कोटी
पत्रकारांना पुरस्कार-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.
3)नैतिक मूल्य
तारीख : 02/11/2022 -
योजनेचे स्वरूप : 100% केंद्र पुरस्कृत
योजनेचा तपशील : पारंपरिक ऊर्जा साधने जसे पेट्रोल, केरोसिन, कोळसा, नैसर्गिक वायू व लाकडी इंधन ही काळाच्या ओघात संपणारी ऊर्जा साधने आहेत. यांच्या वापरावरील भार कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी, सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सन 1982 – 83 पासून शासनाने राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही 100 % केंद्रीय क्षेत्र योजना कार्यान्वित केली आहे.
सदर योजना जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत केंद्र शासन दरवर्षी राज्यास बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट ठरवून देते. ठरवून दिलेले उद्दिष्ट राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना वाटप करण्यात येते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्यास 100% निधी 2 ते 3 हप्त्यात उपलब्ध करुन देते.
योजनेचे निकष :
योजना राबविताना लाभार्थी असलेल्या गावांचा समूह करून योजना राबविण्यात यावी.
बायोगॅस संयंत्राची मागणी निश्चित करताना लोकांचा सहभाग घ्यावा.
दोन किंवा अधिक जनावरे असलेल्या कुटुंबांची लाभार्थी म्हणून निवड करणे.
दोन किंवा अधिक जनावरे असलेल्या कुटुंबांची संख्या जास्त असल्यास अशा गावांच्या समूहाची निवड करणे.
ज्या जिल्ह्यात बायोगॅस संयंत्र कार्यान्वित राहण्याचे प्रमाण अधिक आहे व संयंत्रांच्या देखभाल व दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध आहेत, अशा भागास अधिक बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट देण्यात यावे.
उद्दिष्टांचे वाटप करताना स्वयंसेवी संस्था, उद्योजकांकडील प्रशिक्षित गवंड्यांची संख्या विचारात घेऊन बायोगॅस संयंत्र वाटप करावेत.
केंद्र शासनाने बायोगॅस संयंत्र बांधकामाचे नवीन दर निश्चित करुन दिनांक 02 नोव्हेंबर, 2022 रोजी नविन सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरचे दर सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत.
राज्यात बायोगॅसची तंत्रशुद्ध पद्धतीने उभारणी व्हावी म्हणून संयंत्र बांधणाऱ्या गवंड्यांना व ट्रेनर्सना या योजनेखाली प्रशिक्षण व उजळणी प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षित झालेल्या गवंड्यांकडून बायोगॅस संयंत्रे बांधली जातात. बायोगॅस संयंत्राचा वापर व देखभाल दुरुस्ती करण्यासंदर्भात लाभार्थ्यांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येते.
केंद्र शासनाने दिनांक 02.11.2022 रोजीच्या मार्गदर्शक सूचनेतील सुधारित दर खालीलप्रमाणे
अ)
सर्वसाधारण लाभार्थी
1 घ. मी.
रु. 9,800/-
2 ते 4 घ. मी.
रु. 14,350/-
5 ते 7 घ. मी.
रु. 22,750/-
अनुसूचित जाती/जमाती
1 घ. मी.
रु. 17,000/-
2 ते 4 घ. मी.
रु. 22,000/-
5 ते 7 घ. मी.
रु. 29,250/-
ब)
i) बायोगॅस संयंत्रास शौचालयास जोडल्यास
1 ते 10 घ. मी.
रु. 1600/-
ii) MNRE मान्य बायोगॅस स्लरी युनिट
1 ते 25 घ. मी.
रु. 1600/-
क)
टनेज फीची ( 5 वर्षांच्या हमी कालावधीतील देखभाल दुरुस्तीसाठी )
1 ते 10 घ. मी. पर्यंत संयंत्रास रु. 3000/-
15 ते 25 घ. मी. आकारमान असलेल्या संयंत्रांसाठी मात्र टनेज फीची जॉब ऑफ पूर्व-निर्मित/उत्पादित बायोगॅस संयंत्रासाठी पात्र असणार नाही.
बायोगॅस यादी
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे.
1)रोजगार मेळावे
2)आदिवासी उमेदवारांसाठी सेवा योजना प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे
3)रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना
4)ग्रंथालयसदृश अभ्यासिका सुरु करणे
1)केंद्रीय अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजना
2)खावटी कर्ज योजना
3) ठक्कर बाप्पा आदिवासी बस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम
4) नवसंजीवनी योजना
1)एकात्मिक बाल विकास सेवा योजना
2) मनोधैर्य योजना.
3) राजीव गांधी सबला योजना
4) बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना
5)माझी कन्या भाग्यश्री योजना
6) बाल संगोपन योजना
7) बाल सल्ला केंद्र
8) निराश्रित महिलांसाठी आधार गृहे
9)अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्री बाई फुले बहुउदशिय महिला केंद्र
10) महिला समपदेश केंद्र शुभमंगल
11)शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
12)अनाथालय महिला स्वीकृती केंद्रे आणि
संरक्षित गृहे यामधील .
13) निराधार आणि परित्यक्त्या
विधवांच्यामुलींच्या विवाहाकरीता अनुदान
ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करणेचे दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीद्वारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात रहाण्या-या व अंग मेहनतीची अकुशल कामे करण्या-या, मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारीत केला असुन सदर कायदयान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना,व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आमलात आणलेली आहे.जिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.
✓ योजनेची वैशिष्ठे –
● ग्रामपंचायत स्तरावर कामाची निवड ग्राम सभा करणार
● तालुका पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी पंचायत समिती देणार
● जिल्हा पातळीवर नियोजन आराखडयास मंजुरी जिल्हा परिषद देणार
● मंजुर कामांच्या ७५ टक्के खर्चाची कामे ग्राम पंचायत मार्फत राबविणार
● १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजगार देण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहिल.
● शासन निकषा प्रमाणे किमान मजुरीची हमी.
● अर्ज केल्यापासुन १५ दिवसांत रोजगार पुरविणार.
● कुटुंबातील प्रौढ व्यक्ती अर्जाद्वारे त्याचे सर्व कुटबातील व्यक्तींची नावे नोंदणी करु शकतील
● एकदा केलेली नोंदणी ५ वर्षे कालावधीकरीता राहिल.
● रोहयो कायदया अंतर्गत मजुरांना मिळणा-या सर्व सोई सुविधा मिळतील.
● विविध स्तरावरील कर्तव्य्
✓ १.ग्रामपंचायत स्तरः- –
● कुटुंबांची /मजुरांची नोंदणी करणे/जॉबकार्डवरील नोंदी करणे
● मजुरांची कामाची मागणी घेणे/कामे पुरविणे
● कामाचे सर्वेक्षण करणे/अंदाजपत्रक करणे
● कामाचे नियोजन करणे
● मजुरांना मजुरी व कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे
● वेळेवर मजुरी वाटप करणे
● सामाजिक अंकेशन
✓ २.तालुका स्तर –
● ग्रामपंचायतींना कामाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करणे
● कामाचे नियोजन करुन घेणे
● हजेरीपट व निधीचा हिशोब ठेवणे
● तालुक्याची माहिती संगणक प्रणालीचा वापर करुन संकलित करुन जिल्हा स्तरावर पाठविणे
● संगणक प्रणालीद्वारे झालेल्या कामांचे हजेरीपट ऑनलाईन करणे
✓ ३.उपविभाग स्तर–
●महसुल विभाग
✓ ४.जिल्हास्तर–
● जिल्हयातील सर्व कामांचे नियोजन करुन घेणे
● निधींचा हिशोब ठेवणे
● केंद्र राज्य शासनाकडे आवश्यक ती माहिती पाठविणे
● कामाचे सनियंत्रण करणे.
● ग्रामसेवक/ग्रामरोजगार सेवक यांची कर्तव्ये
● कुटब नोंदणी रोजगार पत्रक वाटप/कामांचे वाटप
● नियोजन आराखडा-कामांचा समावेश/प्राधान्यक्रम/सेल्फ तयार करणे.
● ७५ टक्के कामाचे कार्यान्वयन
● मजुरी वाटप
● बेरोजगार भत्ता वाटप(पहिले-३०दिवसांसाठी.२५टक्के पुढील १०० दिवसापर्यंत किमान वेतनाच्या ५० टक्के)
● रोजगार हमी दिन आयोजन
● सामाजिक लेखा परिक्षणास मदत.
✓ सरपंचांची भुमिकाः-–
● ग्रामपंचायत क्षेत्रात घ्यावयाची कामे ग्रामसभेमध्ये निश्चित करणे.
● गट कार्यक्रम अधिकारी यांच्या मंजुरीने कार्यक्षेत्रातील कामे हाती घेणेकामी विविध यंत्रणांना मदत करणे.
● ग्राम सभेच्या शिफारशी नुसार ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणेकामी मदत.
● पुढील वर्षी घ्यावयाच्या कामांचा विकास आराखडा गट कार्यक्रम अधिकारी यांचेकडे पाठविणे कामी मदत.
● मजुरांची मागणी केलेनंतर कामे तात्काळ सुरु करणेचे दृष्टीने पाठपुरावा करणे
● सामाजिक अंकेशन कामी मदत.
● वार्षिक नियोजन व लेबर बजेट
1)प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना पुरस्कार.
2)प्रधानमंत्री सुरक्षा योजना
3)अटल पेंशन योजना
4)सुकन्या समृध्दी योजना
5)इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
6) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
7)इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना
8)राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण अटी आहेत. सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाणार आहे.
✓ घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे. घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचे स्वरूप:–
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.
✓ लाभार्थी पात्रता:–
1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.
2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.
4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.
5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :- अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख
✓ घराची किंमत मर्यादा:–
घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख
✓ आवश्यक कागदपत्रे:–
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र 4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
9. ग्रामसभेचा ठराव