ग्राम पंचायत अंतर्गत अभ्यासिका
ग्राम पंचायतीची मासिक सभा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कनकापुर येथे गावात मुक्कामी राहून संपर्क अधिकारी व ग्राम पंचायत अधिकारी यांनी महिलांची सभा घेऊन त्यांना अभियानातील महिलांचे सहभाग, योगदान व बचत गट/ स्वयं सहायता समूहाचे महत्व या सर्व बाबी समजावून सांगितल्या. प्रत्येक महिलेने ग्राम पंचायत कर थकबाकी सह भरून ग्राम पंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन मां सरपंच सो यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कर वसुली विशेष मोहीम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बांधकाम विभाग पंचायत समिती देवळा येथील स्थापत्य अभियंता यांनी ग्राम पंचायत कनकापुर येथिल दिव्यांग लाभार्थी सौ निर्मला संजय शिंदे यांच्या घरकुल कामाचे line out करून दिले व घरकुल बांधकाम संदर्भात मार्गदर्शन केले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत मौजे कांचने अंगणवाडी केंद्रात आज स्वच्छता शपथ घेण्यात आली व ICDS दिवस साजरा करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मोफत उपक्रम -
रक्त तपासणी शिबिर आयोजित करणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कनकापुर येथे प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे विजयादशमी च्या शुभ मुहूर्तावर घरकुलाचे भूमी पूजन करण्यात आले व कामास शुभारंभ करण्यात आला ☘️☘️☘️
कनकापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जनजागृती कामी मशाल फेरी काढण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कांचने येथे महिलांची बैठक आयोजित करण्यात आली व अभियानाबाबत माहिती देण्यात आली व जनजागृती करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कनकापूर व कांचने येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली ➕🚑🩺💊💉🌡
प्रभात फेरी द्वारे गावात जनजागृती
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकापूर येथे विविध उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात स्वच्छता संदेश, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, घोषवाक्य स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक खेळ, कविता व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात हिरीरीने भाग घेऊन सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.त्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले
🌎🌍🌪🚮💨🌳🌴☘💦🏵🐝🔥
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील नवरात्र मंडळ यांची बैठक आयोजित करण्यात आली व जनजागृती करण्यात आली व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत गावातील कंपोस्ट खत खड्डे भरण्यात आले ग्रामस्थानी श्रमदान करून मारुती मंदिर परिसर स्वच्छ केले
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर सभा घेऊन अभियानास सुरुवात
🌎🌍🌱🪴 माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम
वृक्ष लागवड साठी रोपवाटिका तयार करणे
ग्राम पंचायती ने बांबु व सीताफळ च्या एकूण 3000 रोपांची रोपवाटिका तयार केली आहे 🪴🌱🌍🌎
🌎🌍💦💨🌪️🌌🔥माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी जल वायु आकाश व अग्नि या पंच तत्वांची शपथ घेण्यात आली 🌎🌍💦🌪️💨🌌🔥
माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी व जल घटकावर आधारित उपक्रम सखोल चारी करणे 🌳🌱💧💦🌎🌍
माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम वृक्ष लागवड ;नागन हुडी टेकडीवर वृक्ष लागवड सुरू असलेले काम
E-pladge 🌿🍀☘️🌎🌍
🌴🌳माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम वृक्ष लागवड
वृक्ष लागवड साठी खड्डे खोदण्याचे काम सुरु झाले आहे 🌳🌴🌱🌎🌍
🌍🌎🌳☘️🍀🌿🌴🌱🪴माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम
अंगणवाडी केंद्र कांचने येथे परसबाग तयार करणे व टाकाऊ वस्तू पेंट चे डबे इत्यादी साहित्य वापरून त्याचा सुशोभित फुल झाडांची लागवड करण्या साठी कुंडी म्हणून वापर करणे 🌿🌴🍀☘️🌳🌎🌍
माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जल घटकावर आधारित उपक्रम माशांचे बी गाव तलावात व विहिरीत सोडण्यात आले
माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी जल वायु आकाश अग्नि या पंच तत्वांची शपथ घेताना ग्राम पंचायत कनकापूर येथिल स्वयं सहायता महिला समूह
सोबत ग्राम पंचायती च्या आदरणीय सदस्या सौ अनुराधा ताई तुळशीराम जैन, ग्राम पंचायत अधिकारी श्रीमती सरिता मिस्तरी, pesa मोबिलायझर सौ सोनाली मोरे, ICRP सौ मनिषा बच्छाव आदी.
🌎🌍🌪💨 माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत वायु घटकावर आधारित उपक्रम. अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करणे 🌪💨🚮🌎🌍
माझी वसुंधरा अभियान 6.0 व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कनकापुर येथे राह फाउंडेशन मुंबई यांचे मार्फत सध्या वृक्ष लागवडी चे काम सुरु झाले आहे या कामाचा आढावा घेण्या साठी तसेच गावातील ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आमच्या ग्राम पंचायती ला राह फाउंडेशन मुंबई चे श्रीमती शरयू कामथ (उपाध्यक्ष) मॅम यांनी भेट दिली
ग्राम पंचायतिचे नियोजन, गावकऱ्यांची सकारात्मक भूमिका तसेच गावाच नैसर्गीक सौंदर्य पाहून अतिथी खूप आनंदी झालेत
ग्राम पंचायतिच्या वतीने आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत करण्यात आले
आदरणीय मॅम यांनी आपल्या गावातील सूरू असलेल्या कामांबाबत सविस्तर माहिती दिली तसेच आपल्या गावात आणखी कोणकोणती कामे आपण फाउंडेशन मार्फत करू शकतो याचीही माहिती दिली
गावातील ग्रामस्थांची एकजूट पाहून काम करताना निश्चितच आनंद होईल असे त्यांनी म्हटले
ग्राम पंचायती च्या वतीने उपसरपंच श्री जगदीश नानासाहेब शिंदे यांनी मागील काळात ग्राम पंचायती मार्फत केलेल्या उल्लेखनीय कामांची माहिती दिली व आपल्या गावाची निवड करून फाउंडेशन मार्फत कामे सुरू केली या बद्दल अतिथींचें आभार मानले
शेवटी श्रीमती शरयू मॅम यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 🌳☘️🍀🌿🌴🪴🌱🌎🌍
🌎🌍🌪💨 माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत वायु घटकावर आधारित उपक्रम. अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता करणे 🌪💨🚮🌎🌍
ग्राम पंचायत कनकापुर येथिल महसूली गाव कांचने येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान तसेच माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत वायु घटकावर आधारित उपक्रम स्वच्छता करणे
अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व महिला ग्रामस्थ यांनी कांचने येथील सर्व सार्वजनिक वापराचे ठिकाणे उदा, रस्ते, सभा मंडप इत्यादी ठिकाणी श्रम दानातून स्वच्छता केली
ग्राम पंचायत कनकापुर येथिल महसूली गाव कांचने येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान तसेच माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम कंपोस्ट खत खड्डे भरणे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व महिला ग्रामस्थ यांनी कंपोस्ट खत खड्डा भरण्याचे उपक्रम केले
🌍🌎 माझी वसुंधरा अभियान 6.0, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत वायु घटकावर आधारित उपक्रम
टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे
गावातील निरूपयोगी पाण्याच्या टाक्या, टायर, पाणी बाटल्या, कलर पेंट चे डबे इत्यादी साहित्य ग्राम पंचायती मार्फत जमा करण्यात आले
पाण्याच्या टाकी पासून कचरा कुंडी तयार करण्यात आली
या कचरा कुंडी गावातील किराणा दुकानात सुका कचरा संकलन करण्या साठी लावण्यात आल्या 💨🌪🚮
🔥 माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत उपक्रम e-pladge
भुमी जल वायु आकाश व अग्नि या पंच तत्वांची शपथ घेण्यात आली
🌍 माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत भुमी घटकावर आधारित उपक्रम
वृक्ष लागवड कामाची नियोजित जागा नियोजित जागेवर वृक्ष लागवड करणे
माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मुर्त्या बनवणे व कुंडात विसर्जित करणे
सध्याच्या (२०२५) परतीच्या पावसामुळे कनकापुर गोठाणे धरण तुडूंब भरून वाहत आहे. निसर्गाने दिलेल हे सौंदर्य गावासाठी अद्भुत देणगी आहे.
ग्राम पंचायत कनकापुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली
आज विजया दशमी च्या शुभ मुहूर्तावर प्रधानमंत्री आवास योजनेच्या
भारती कडू शिंदे
सुनंदा रमेश शिंदे
पुष्पा गणेश शिंदे
प्रकाश हरी बर्वे
या लाभार्थ्यांनी पूर्ण केलेल्या घरकुलात गृह प्रवेश केले
या सर्वांचे हार्दिक अभिनंदन
💐💐💐💐
गावाच्या निर्णयांसाठी ग्रामसभा